सुशांतच्या शेवटच्या चित्रपटावर एक्स गर्लफ्रेंड अंकिता म्हणाली…

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर त्याचा ‘दिल बेचार’ हा शेवटचा चित्रपट 24 जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला चाहत्यांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे ने सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाविषयी ट्विट केले आहे, जे  सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

“पवित्र रिश्ता ते दिल बेचारा,एक शेवटची वेळ”, असे भावनिक ट्विट अंकिताने केले आहे. अंकिता आणि सुशांत यांनी सोबत ‘पवित्र रिश्ता’ या प्रसिद्ध मालिकेत काम केले होते.

सुशांतसिंग राजपूतविषयी अभिनेत्री अंकिता लोखंडेचे ट्विट खूपच व्हायरल होत आहे आणि बरेच लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर अंकिताला धक्का बसला होता. ती सतत स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करतआहे. सुशांतचा अखेरचा चित्रपट ‘दिल बेचार’ सतत नवीन रेकॉर्ड करत आहे, हा चित्रपट पाहून सर्वच प्रेक्षक भावूक होत आहेत.

सुशांतसिंग राजपूतने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही सीरियल ‘किस देश में है मेरा दिल’ पासून केली होती. यानंतर तो झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतही दिसला. यानंतर झलक दिखला जाने आपल्या स्टाईलने लोकांची मने जिंकली. तेव्हापासून त्याने चित्रपटांच्या जगात आपली जागा बनवली.  सुशांतसिंग राजपूतने ‘काय पो चे’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक केल्यानंतर त्याला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.