सुशांतच्या वाढदिवशी कंगनानं मूव्ही माफिया म्हणत महेश भट्ट, करण जोहरवर केली खोचक टीका

मुंबई – ‘सुशांत सिंह राजपूत’ हे नावं जेव्हा जेव्हा समोर येतं तेव्हा आजही अनेकांच्या मनाला त्याची अकाली एक्झिट चटका देऊन जाते. 14 जून 2020 ला सुशांतचा जीवनप्रवास  संपला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशलवर फॅन्स द्वारे त्याने केलेल्या भूमिकांचे फोटो शेअर करत अनेक  आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. सोशलवर अनेक चाहते  आज त्याच्या आठवणींमध्ये भावूक झाले आहेत. यातच   अभिनेत्री कंगना रणौतने देखील ट्वीट केले. पण तिने या ट्वीटच्या माध्यमातून यशराज, महेश भट्ट आणि करण जोहर यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

नेमकं काय म्हणाली कंगना राणावत 

‘प्रिय सुशांत, मला असे वाटत होते की तू  मूव्ही माफियांचे टॉर्चर सहन करण्यास सक्षम आहेस माझा  हा समज चुकीचा होता, तु अनेकदा सोशलवर मदतीसाठी विनंती करत होता मात्र मी तुला मदत त्यावेळी करू शकले नाही. याची मला खंत आहे. तुला नेहमीच मूव्ही माफियां नी  त्रास दिला. असं म्हणत  कंगानाने यशराज, महेश भट्ट आणि करण जोहर यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला  आहे.”

दरम्यान, ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करुन वारंवार वादग्रस्त विधानं करणाऱ्या कंगनावर ट्विटरने तात्पुरते निर्बंध आणले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.