नरेंद्र मोदींच्या व्हिडिओवर प्रकाश राज म्हणाले…

नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. तामिळनाडूतील महाबलीपुरममध्ये पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांची दोन्ही देशांदरम्यानच्या द्विपक्षी संबंधांबाबत दोन दिवस अनौपचारिक चर्चा होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाबलीपुरम येथील समुद्रकिनाऱ्यावर मॉर्निंग वॉक करताना बीचवर साफसफाई केली. आणि बीचवरील कचराही उचलला. याबाबतचा व्हिडीओ स्वत: मोदींनी ट्विट केला आहे. समुद्रकिनाऱ्यावरच्या स्वच्छतेनंतर त्यांनी हॉटेल कर्मचाऱ्यांना सुद्धा स्वच्छतेचा संदेश दिला.

दरम्यान, मोदींचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ शेअर करत अभिनेते ‘प्रकाश राज’ यांनी सुरक्षा यंत्रणांना सवाल केला आहे. “आपल्या नेत्याच्या सुरक्षेचं काय? तुम्ही त्यांना कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेशिवाय, केवळ एका पाठलाग करणाऱ्या कॅमेरामॅनसोबत एकटं जाऊच कसं दिलंत? परदेशी शिष्टमंडळ भारत भेटीवर येणार असल्याचे माहीत असूनही संबंधित विभागाने समुद्र किनाऱ्याची स्वच्छता का केली नाही. संबंधित विभागाची असं वागायची हिम्मत तरी कशी झाली?” असा खोचक सवाल प्रकाश राज यांनी विचारला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.