एकीकडे वोटभक्ती तर दुसरीकडे देशभक्तीचे राजकारण – मोदी 

पाटणा – ‘भारत माता कि जय’ म्हणण्यासाठी काही लोकांच्या पोटात दुखते. एकीकडे वोटभक्ती आहे तर दुसरीकडे देशभक्तीचे राजकारण आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नाव न घेता केली. बिहारमधील एका प्रचारसभेत ते बोलत होते.

नरेंद्र मोदी म्हणाले कि, ‘भारत माता कि जय’ म्हणण्यासाठी काही लोकांच्या पोटात दुखते. एकीकडे वोटआहे तर दुसरीकडे देशभक्तीचे राजकारण आहे. कोणत्याही जाती अथवा  पंथाच्या आधी आपण सर्व भारतीय आहोत. भारतीय हीच आपली ओळख आहे. भूमातेच्या सेवा आणि साधनेच्या भावनेने मी मागील पाच वर्ष काम करत आहे, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसवर टीका करताना मोदी पुढे म्हणाले, २६/११ मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. परंतु, काँग्रेस सरकारने सैन्याला कोणतीही कृती करण्यास मनाई केली. काँग्रेसने पाकिस्तानातून येणाऱ्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्याऐवजी हिंदूंसोबत दहशतवादी शब्द जोडण्याचा कट रचला. व तपासाची पूर्ण दिशा बदलवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आमच्या सरकारने दहशतवाद्यांविरुद्ध पहिले सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केले. भारताने दहशतवाद्यांना घरात घुसून मारले, असे मोदींनी म्हंटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.