9 ऑक्‍टोबरपासून बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर

मुंबई – बेस्ट कर्मचारी विविध मागण्यांसाठी 9 ऑक्‍टोबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती बेस्ट वर्कर्स युनियनचे नेते शशांक राव यांनी दिली आहे. बेस्ट वर्कर्स युनियन आणि बेस्ट प्रशासन यांच्यामध्ये सुरु असलेला वेतन कराराचा वाद अजूनही सुरुच आहे.

वेतन वाढीसह अनेक मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुन्हा बेमुदत संपाची शस्त्र हाती घेण्याचा निर्णय घेतला. बेस्ट वर्कर्स युनियनने याबाबत बेस्ट प्रशासनाला पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये बेस्ट प्रशासनाने बेस्ट वर्कर्स युनियनसोबत वाटाघाटी करुन अंतिम करार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

जोपर्यंत कर्मचारी संघटनेसोबत अंतिम करार होत नाही तोपर्यंत बेस्ट कर्मचाऱ्यांना महिना 10 हजार रुपयांची अंतरिम वाढ देण्यात यावी.

तसंच, पालिकेच्या बेस्ट उपक्रमासंबंधित ‘क’ अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या ‘अ’ अर्थसंकल्पात विलीन करण्याच्या ठरावांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी बेस्ट वर्कर्स युनियनने केली आहे.

बेस्ट युनियनच्या मागण्या खालील प्रमाणे –

– 2016-17, 2017-18 आणि 2018-19 या कालावधीत पालिकेने जाहीर केलेला दिवाळी बोनस देण्यात यावा.

– अनुकंपा भरती तातडीने सुरु करण्यात यावी.

– बेस्ट बसचा ताफा 3,337 इतका करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने तातडीने स्वत:च्या मालकीच्या बस घ्याव्यात.

– बेस्ट उपक्रमाच्या आस्थापना सूचीवरील पदसंख्येनुसार रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)