मुंबई – अनेकांना भाजप सोडण्याची इच्छा असल्याची ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हंटले आहे. खडसेंनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जयंतराव मला बोलले तुम्ही राष्ट्रवादीत आले तर ईडी-बिडी लावतील, तर मी बोललो मी सीडी लावीन, अशी फटकेबाजी करत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेशाबाबत ‘रात गयी बात गयी’ असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी बोलणं टाळणं आहे. नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश नंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. भाजपकडून त्यांच्यावर अनेक टीका करण्यात आली आहे.
तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंना लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी देतात याकडे आमचंही लक्ष असेल, अशी खोचक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीवर केली होती. मात्र आज वृत्त माध्यमांशी चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर बोलणं टाळलं आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे भाजपनं खडसेंचा विषय सोडला का? अशी राजकीय चर्चा सुरू आहे.