नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात मागील एका महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. यातच आंदोलनाववर टीका करत अभिनेत्री कंगना राणावतने पंजाबमधील 73 वर्षीय मोहिंदर कौर यांचा आंदोलनात सहभागी झालेला फोटो ट्विट करून या आजी शाहीन बाग आंदोलनातही होत्या. त्यांना 100 रुपये दिले की त्या आंदोलनात येतात अशी टीका केली होती.
या टीकेवर आता अखेर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत पंजाबमध्ये कंगनाचा एकही नवा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा तिला दिला आहे.
वृत्त माध्यमांशी बोलतांना शेतकरी म्हणाले, ‘कंगना नेहमीच आमच्या आंदोलनाचा विरोध करत आमची तुलना खलिस्तानी आणि दहशतवाद्यांशी करत आहे. आंदोलनात सामिल झालेल्या वृद्ध शेतकऱ्यांवर देखील ती टीका करत आहे. या व्यतिरिक्त ती जे बॉलीवूड सेलेब्स आंदोलनात सामिल झाले त्यांच्यावर देखील ती सरकारच्या वतीनं निशाणा साधत आहे. असे आरोप त्यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी यापुढे कंगनाचा एकही चित्रपट पंजाबमध्ये प्रदर्शित होणार नाही असा इशारा तिला दिला आहे.