विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जूनला मुंबईत होणार

मुंबई: विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन कामकाजाचा राष्ट्रगीताने आज समारोप करण्यात आला. १७ जूनला विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. यावेळी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी राज्यपालांकडून आलेला संदेश वाचून दाखविला.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे दि. १७ जून  रोजी होणार असल्याची घोषणा अध्यक्ष श्री. बागडे यांनी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपाध्यक्ष विजय औटी आदींसह विधानसभा सदस्य उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.