मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस बुधवारी 30 जून रोजी वाढदिवस झाला. आपल्या कुटुंबीयांसमेवत घरीच साधेपणाने त्यांनी वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावरही सुप्रिया सुळे यांना वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छा दिल्या.
सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांची कन्या रेवती हिने स्वत:च्या पैशाने केक आणला होता. लेकीनं दिलेलं हे गिफ्ट आई सुप्रिया सुळे यांच्या मनाला भिडलं. त्यामुळे, त्यांनी ट्विटरवरुन या केकभेटीचं कौतुक करणाऱ्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सुप्रिया सुळे ट्विटमध्ये म्हणाल्या की, ‘हा केक माझ्या वाढदिवसाचं स्पेशल गिफ्ट… कालपरवापर्यंत अवतीभवती वावरणारी माझी लेक रेवती आता नोकरी करते. तिने तिच्या पगारातून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आवर्जून हा केक आणला आणि आईचं मन लेकीच्या कौतुकानं सुखावलं. मुलांचं यश आई-वडीलांना आपल्या यशापेक्षा नेहमीच मोठं वाटतं’, अशा भावनिक शब्दात सुप्रिया सुळेंनी आनंद व्यक्त केला आहे.
हा केक माझ्या वाढदिवसाचं स्पेशल गिफ्ट… कालपरवापर्यंत अवतीभवती वावरणारी माझी लेक रेवती आता नोकरी करते. तिने तिच्या पगारातून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आवर्जून हा केक आणला आणि आईचं मन लेकीच्या कौतुकानं सुखावलं. मुलांचं यश आई-वडीलांना आपल्या यशापेक्षा नेहमीच मोठं वाटतं. pic.twitter.com/yGYpu2HFsE
— Supriya Sule (@supriya_sule) July 1, 2021
याआधी सुप्रिया सुळे यांनी कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केल्याचे फोटो शेअर केले होते.