नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचे रूग्ण वाढत असल्याने दिल्ली सरकारने नवीन वर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम व ख्रिसमसच्या जाहीर कार्यक्रमांना मनाई केली आहे. दिल्ली डिझास्टर मॅनजमेंट ऍथॉरिटीने तसा आदेश जारी केला आहे.
या संस्थेने दिल्ली पोलिसांना त्या विषयीचे आदेश दिले असून त्याची कडक अंमलबजावणी करण्याची सुचना केली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाला या विषयीचे रिपोर्ट रोज सादर करण्याची सूचनाही केली आहे.
दिल्लीत सध्या ओमायक्रॉनचे 57 रूग्ण आढळून आले आहेत. देशात ओमायक्रॉनचे एकूण 213 रूग्ण आढळून आले असून त्यातील सर्वाधिक रूग्ण दिल्लीत आहेत.
या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारकडून ही उपाययोजना केली गेली आहे. ओमायक्रॉन विषाणुमुळे देशात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे दिल्ली प्रशासनाने त्या अनुषंगाने उपाययोजना सुरू केल्या आहेत.