बारामती- राष्ट्रीय स्तरावरील गुरुग्राम सनसिटी स्कूलमध्ये झालेल्या सीबीएसई राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदिर शाळेचा विद्यार्थी ओम पवारने शाश्वत शेती पद्धत हा प्रकल्प सादर केला. जलसंवर्धनावर जोर देऊन शाश्वात विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान हा या प्रदर्शनाचा मुख्य विषय होता. कमी पाण्यात व कमी खर्चात शाश्वत शेती कशी करावी हा या प्रकल्पाचा मुख्य विषय होता.
दि मिरॅकल्स ऑफ सिंपल सस्टेनॅबिलिटी-सेव्ह ब्ल्यू, गो ग्रीन अंडर दि सब थीम सबस्टेनेबल अँग्रिकल्चरल प्रॅक्टीसेस या विषयावर त्याने प्रकल्प सादर केला. भारतातून निवडक प्रकल्पांची निवड या राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनासाठी करण्यात आली होती. शाळेच्या शिक्षिका मंजुषा मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली ओम पवारने हा प्रकल्प सादर केला. प्राचार्या कल्पना बारवकर व लिला शेट्टी यांनी ओम पवार व मंजुषा मोकाशी यांचे अभिनंदन केले.