पुणे/महर्षीनगर – जैन समाजातील व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संस्था म्हणुन प्रसिद्ध असलेल्या “जितो’ पुणेच्या अध्यक्षपदी उद्योगपती ओमप्रकाश रांका यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मुख्य सचीव पदी युवा उद्योजक पंकज कर्नावट यांची निवड झाली आहे.
ओमप्रकाश रांका म्हणाले की, भविष्यात प्रामाणिकपणे मेहनत करून “जितो’ची सामाजिक पातळीवरील प्रतिमा आणखी उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात पुण्यात “जितो’तर्फे मोठा उपक्रम उभारणार असून हजारो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. पुण्यातील वेस्टइन हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात रांका व कर्नावट यांचा शपथ विधी संपन्न झाला.
“जितो’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी यांची “जितो’च्या व्हाईस चेअरमन पदी निवड झाली. रांका व कर्नावट यांच्या समोर “जितो’चे सदस्य वाढवणे,कोविड सेंटर, “जितो’चे साधार्मिक लोकांसाठी बांधण्यात येणारी घरे, लॉकडाऊनमुळे विस्कळीत झालेल्या व्यापारी वर्गाला मदत करणे, अशी अनेक कामे आहेत. “जितो’ पुणेच्या मुख्यटीममध्ये ओमप्रकाश रांका, पंकज कर्नावट यांच्यासह अशोक हींगड, अजित शेठिया, इंदर जैन, राजेंद्र बाठीया, चेतन भंडारी, किशोर ओसवाल,हितेश शहा, संदीप लुनावत यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच डायरेकटरपदी अभय बाफना, अमित भेटेवरा, ऋषभ सांकला, दिनेश ओसवाल,दिलीप जैन, ललित गुदेचा, मनोज छाजेड, रवी दुगड, राहुल सांकला, संजय छाजेड,सचिन जैन, उपेश मरलेचा, विनोद मांडोत, योगेश मेहता यांची निवड झाली आहे.
जितो पुणे महिला अध्यक्षपदी खुशाली चोरडीया तर सचिव पदी लकीशा मरलेचा यांची व युथच्या अध्यक्षपदी गौरव नहार व सचिव पदी प्रीतेश मुनोत यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला जितोचे विजय भंडारी, विजयकांत कोठारी, राजेश सांकला, ऍड. एस.के.जैन, इंदर छाजेड, अचल जैन, रमेश गांधी, शर्मिला ओसवाल, प्रियंका परमार,कांतीलाल ओसवाल, अजय मेहता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते, अशी माहिती “जितो’ पुणेचे प्रसिद्धी प्रमुख संतोष जैन यांनी दिली. या कार्यक्रमाला झूमद्वारे संपुर्ण देशभरातील “जितो’सदस्य व वरिष्ठ पदाधिकारी सहभागी झाले होते. प्रास्ताविक चेतन भंडारी यांनी केले तर पंकज कर्नावट यांनी आभार मानले.