नवी दिल्ली – मागील काही दशकापासून ग्राहकांच्या पसंतील उतरलेल्या मारुती सुझुकीने ओमनीचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशात सर्वाधिक प्रसिद्ध मिळविलेल्या ओमनीचा विक्रीतील टक्का हा समाधानकारक राहिलेला आहे. तर ओमनीने आपल्या ग्राहकांना सुविधाप्रमाणे यातील उत्पादनाची निवड करू शकत होते. त्यामुळे आजही या गाडीची मागणी कमी झालेली नाही आहे. परंतु कंपनीच्या एका अहवालानुसार ओमनीचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय सादर केला आहे.
ओमनी मारुती सुझुकीने प्रथम मारुती 800 चे लॉंचिंग केले होते. त्यानंतर एका वर्षाने 1984 मध्ये ओमनीचे सादरीकरण करण्यात आले. मारुती सुझुकीने सुझुकी ऐको एमपीव्हीचे भारतात सादरीकरण केले होते. यात रिव्हर्स पार्किंग, को-ड्रायव्हर सीट बेल्ट रिमांडर यासारख्या फिचर्स दिले होते. नवीन रस्ते नियावलीमुळे कंपनी आपले उत्पादन बंद करणार असल्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी नमूद केले आहे.सराकारकडून एबीएस, एअरबॅग आणि बीएसव्हीआय यांची सक्ती करण्यात आली आहे असे बोलले जात आहे.