OMG! सोनम कपूरचा लग्नपत्रिकेस नकार

सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या लग्नाची बॉलीवुड आणि तिच्या चाहत्यांना खुपच उत्सूकता लागली आहे. त्यामुळेच या दोघांच्या लग्नाबाबत सोशल मीडियामध्ये दररोज नवनवीन चर्चा व्हायरल होत असते. त्यातच आता सोनम कपूरने लग्नपत्रिका न छापण्याचा निर्णय घेतल्याने मीडियावर पुन्हा जोरदार चर्चा रंगत आहे.

अभिनेत्री सोनम कपूरने काही दिवसांपूर्वीच लग्नसोहळ्यासाठी अवास्तव खर्च करणार नसल्याचे सांगितले होते. लग्नात वाजवी खर्च न करता साध्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय सोनमने घेतला. तिच्या या निर्णयाला प्रियकर आनंद आहुजा आणि घरातील अन्य सदस्यांनीही पाठिंबा दिला. या निर्णयाबरोबरच सोनमने पर्यावरण संरक्षणासाठी आणि कागदाचा अपव्यय टाळण्यासाठी लग्नपत्रिका न छापण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहुण्यांना लग्नाचे आमंत्रण कागदाच्या पत्रिकेऐवजी ई-कार्डद्वारे द्यावे, असे सोनमने ठरवल्याचे समजते. यामुळे सोनमच्या लग्नासाठी पाहुण्यांना ई-कार्डद्वारे पत्रिका पाठवून आमंत्रित करण्यात येणार आहे. दरम्यान, 7 किंवा 8 तारखेला वांद्रा येथील हेरिटेज हवेली येथे सोनमचा लग्नसोहळा होणार असल्याची चर्चा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)