मुंबई: कोरोना व्हायरसची वाढ रोखण्यासाठी देशात 21 दिवस लॉकडाउन सुरू आहे. सामान्य माणसापासून ते मोठ्या नेत्यापर्यंत सर्व घरात लॉकडाउन आहेत. या लॉकडाउनचा परिणाम केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावरही स्पष्टपणे दिसून येतो.
लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून रामदास आठवले हे त्यांच्या घरी आहेत आणि सध्या ते कुटुंबासमवेत वेळ घालवत आहेत. अलीकडेच आठवले यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये आठवले आपल्या पत्नीसमवेत स्वयंपाकघरात आमलेट बनवताना दिसतात.
कोरोना विरुद्ध लढा यशस्वी करण्यासाठी लोकडाऊनमध्ये घरीच राहा. आवडत्या छंदाला वेळ द्या. आज मी घरी आम्लेट तयार केले. किचन मध्ये अनेक वर्षांनी वेळ दिला, असे आठवलेंनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
कोरोना विरुद्ध लढा यशस्वी करण्यासाठी लोकडाऊनमध्ये घरीच राहा.आवडत्या छंदाला वेळ द्या. आज मी घरी आम्लेट तयार केले. किचन मध्ये अनेक वर्षांनी वेळ दिला. pic.twitter.com/fHdilPaUmt
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) April 3, 2020