ओमप्रकाश बिर्ला होणार लोकसभेचे सभापती

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे दोनवेळा लोकसभेवर निवडून आलेले खासदार ओमप्रकाश बिर्ला यांची लोकसभा सभापतीपदासाठी एनडीएतर्फे उमेदवारी घोषित केली आहे. या पदासाठी त्यांच्या उमेदवारीची औपचारीक घोषणा आज करण्यात आली. ते राजस्थानातील बुंदी-कोटा मतदार संघातील खासदार आहेत.

लोकसभेत एनडीएकडे पुर्ण बहुमत असल्याने त्यांची या पदावरील निवड ही आता केवळ एक औपचारीकता राहिली आहे. त्यांच्या नावाच्या प्रस्तावाला एआयडीएमके, वायएसआर कॉंग्रेस, आणि बिजू जनता दल या पक्षांनीहीं पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे नाव या पदासाठी सूचित केले. लोकसभा सभापतीपदासाठी उद्या बुधवारी निवडणूक होणार आहे. 57 वर्षीय बिर्ला हे राजस्थानात तीन वेळ आमदार म्हणूनही या आधी निवडून आले होते.

साधारणपणे लोकसभा सभापतीपदासाठी सर्वाधिक काळ लोकसभा सदस्य राहिलेल्या सदस्याला संधी दिली जाते पण यावेळी केवळ दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आलेल्या सदस्याला संधी देण्यात आली आहे. या आधीच्या सभापती सुमित्रा महाजन या लोकसभेवर आठवेळा निवडून आल्या होत्या. अलिकडच्या काळात सन 2002 साली लोकसभेवर पहिल्यांदाच निवडून आलेल्या मनोहर जोशी यांना सभापतीपदावर काम करण्याची संधी मिळाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)