नवी दिल्ली –ऑलिम्पिक ब्रॉंझपदक विजेती कर्णम मल्लेश्वरी हिची दिल्ली क्रीडा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला.
दिल्ली क्रीडा विद्यापीठाचे कुलपतीही असणाऱ्या दिल्लीच्या राज्यपालांनी मल्लेश्वरी यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे. दिल्ली क्रीडा विद्यापीठ उभारण्याचे विधेयक दिल्ली विधानसभेत 2019 मध्ये संमत करण्यात आले होते.
या विद्यापीठातून पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट या पदवी परिक्षांचा अभ्यास करता येणार आहे. यामध्ये क्रिकेट, फुटबॉल आणि हॉकी यासह इतर खेळांचाही समावेश आहे. मल्लेश्वरी या भारताच्या पहिल्या महिला ऑलिंपिक पदक विजेत्या आहेत.
सिडनी ऑलिम्पिक 2000 स्पर्धेत मल्लेश्वरी यांनी ही कामगिरी केली होती. त्या वेळी त्यांनी स्नॅच प्रकारात 110 आणि क्लिन अॅंड जर्क प्रकारात 130 किलो वजन उचलले होते.
कर्णम मल्लेश्वरी यांच्या विषयी थोडक्यात
1 जून, 1975 साली श्रीकाकुलम, आंध्र प्रदेश येथे जन्म
– 1992 साली आशिया स्पर्धेत तीन रौप्य पदक
– 1994 साली अर्जुन पुरस्कार
– 1999 साली राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार , पद्म श्री पुरस्कार
– 2002 साली वडिलांच्या निधनामुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार
– 2004 साली झालेल्या अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत पदक न मिळाल्यामुळे खेळातून सन्यास