नगर – भारतीय जनता पार्टीच्या पक्षांतर्गत पदाधिकारी निवडणुकीच्या कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. निवडणुकीचा प्राथमिक आढावा घेण्यासाठी पक्ष निरिक्षक खा.गिरिष बापट यांनी नुकताच नगर दौरा केला. नगर शहर व ग्रामीण भाजपाच्या वेगवेगळ्या बैठका घेऊन त्यांनी आढावा घेतला. या बैठकांनंतर शहर भाजपामधील जुन्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खा. गिरिष बापट यांनी शासकीय विश्रामगृहावर भेट घेऊन सत्कार केला.
ज्येष्ठ नेते वसंत लोढा व दामोदर बठेजा यांनी खा.बापट यांना पुष्पगुच्छ दिला. यावेळी ज्येष्ठ नेते सदा देवगावकर, अभय आगरकर, गौतम दीक्षित, बाळासाहेब गायकवाड, उदय अनभुले, मिलिंद गंधे, सचिन पारखी, विलास नंदी आदि उपस्थित होते.
यावेळी पक्षनिरिक्षक खा.गिरिष बापट यांना जुन्या भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नगर शहरात झालेल्या महानगरपालिका, लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा सविस्तर अहवाल देऊन माहिती दिली.
यावेळी खा.गिरिष बापट यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. भारतीय जनता पार्टीचे काम नगर शहरात वाढविण्यासाठी सर्वांनी वेळ द्यावा, असे सांगून निवडणुकी संदर्भात महत्वाच्या सूचना केल्या.