Ola New Electric Bike: ओला इलेक्ट्रिक भारतीय बाजारात अनेक नवीन दुचाकी लाँच करत आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने थर्ड जनरेशन स्कूटरला बाजारात सादर केले होते. आता कंपनीने पहिली इलेक्ट्रिक बाइक रोडस्टर एक्सला लाँच केले आहे.
कंपनीने या एन्ट्री लेव्हल एक्स सीरिजमध्ये रोडस्टर X (Roadster X) आणि रोडस्टर X प्लस हे दोन मॉडेल लाँच केले आहेत. कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक बाइक सिंगल चार्जमध्ये 501 किमी रेंज प्रदानकरते. या बाइकची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
Roadster X चे स्पेसिफिकेशन्स
ओलाने रोडस्टर X ला 2.5 किलोव्हॅट, 3.5 किलोव्हॅट आणि 4.5 किलोव्हॅट अशा 3 बॅटरी पॅकसह लाँच केले आहे. यामध्ये 7 किलोव्हॅट पीक पॉवरसह येणारी मोटर दिली असून, बाइकचा टॉप स्पीड ताशी 118 किमी आहे.
बाइक अवघ्या 3.1 सेकंदात 0 ते 40 किमीचा वेग पकडू शकते. कंपनीचा दावा आहे की, याची आयडीसी रेंज 252 किमी आहे. किंमतीबद्दल सांगायचे तर 2.5 किलोव्हॅट बॅटरी पॅकची किंमत 74,999 रुपये, 3.5 किलोव्हॅट बॅटरी पॅकची किंमत 84,999 रुपये आणि 4.5 किलोव्हॅट बॅटरी पॅकची किंमत 94,999 रुपये आहे.
ओला रोडस्टर X प्लसचे स्पेसिफिकेशन्स
कंपनीने रोडस्टर X प्लसला 2 बॅटरी पॅकमध्ये लाँच केले आहे. याच्या 4.5 किलोव्हॅट बॅटरी बॅकची किंमत 1,04,999 रुपये आणि 9.1 किलोव्हॅटची किंमत 1,54,999 रुपये आहे. यामध्ये 11 किलोव्हॅट पीक पॉवर क्षमतेसह येणारी मोटर देण्यात आली आहे. तर बाइकचा टॉप स्पीड ताशी 125 किमी आहे. कंपनीचा दावा आहे की मोठ्या बॅटरी पॅकसह याची रेंज 501 किमी आहे.
दरम्यान, या इलेक्ट्रिक बाइकच्या सर्व मॉडेलवर कंपनीकडून 15 हजार रुपये इंट्रोडक्ट्री डिस्काउंट दिले जात आहे. या बाइकची ऑर्डर घेण्यास कंपनीने सुरुवात केली असून, डिलिव्हरी पुढील महिन्यापासून सुरू होईल.