नवी दिल्ली – सार्वजनिक प्रवासी वाहतूक क्षेत्रातील बलाढ्य कंपनी ओला आता प्राथमिक समभाग विक्री म्हणजे आयपीओच्या माध्यमातून भांडवल उभारण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
कंपनीला दिड अब्ज डॉलर म्हणजे साधारणपणे 11 हजार कोटी रुपये अपेक्षित आहेत. लवकरच ही कंपनी बाजार नियंत्रक सेबीकडे या संदर्भात कागदपत्रे दाखल करणार असल्याचे वृत्त बाजारात पसरले आहे.