IND VS SA : ‘हिटमॅन रोहितने’ कसोटी क्रिकेटमध्ये ठोकल पहिल द्विशतक

रांची – भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये रांचीमध्ये शेवटचा तिसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केल्याचे पहायला मिळत आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता सध्या 5 बाद 379 धावांवर भारताचा खेळ सुरू आहे. आजच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळात भारताचा हिटमॅन रोहित शर्माने कसोटीतील पहिले द्विशतक झळकावले आहे.

विशेष म्हणजे या सामन्यात रोहितने आपले शतक आणि द्विशतक हे षटकाराच्या सहाय्याने पूर्ण केले आहे. या खेळीने एक अनोखा योगायोग साधला गेला आहे. कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजाकडून झळकावलेलं हे तिसरे द्विशतक ठरले आहे. एका कसोटी मालिकेत भारताच्या ३ फलंदाजांनी द्विशतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

मात्र, मात्र रोहित शर्मा २१२ धावांवर असताना रबाडाच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या नादात एन्गिडीकडे झेल देत माघारी परतला. आपल्या द्विशतकी खेळीत रोहितने २८ चौकार आणि ६ षटकार खेचले. आता सध्या वृद्धिमान सहा 8 धावांवर तर रविंद्र जडेजा 22 धावांवर खेळत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.