नगर – अगदी साडेसात हजार पार गेलेली करोना बाधितांची संख्या सोमवारी तीन आकडीच म्हणजे 684 नोंदवली गेली. गेल्या काही दिवसांपासून असलेले भीतीचे सावट काहीसे हलके झाले. संख्या कमी होत असल्याची दिलासादायक बाब ठरली आहे. करोनाची ही दिलासादायक आकडेवारी सुधारण्यात डाॅक्टर आणि परिचारिका यांचा मोलाचा वाटा आहे.
या महामारीच्या काळात रुग्णासोबत डॉक्टर आणि नर्स यांना स्वःताहाचेही मानसिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळणे तितकेच गरजेचे आहे. त्यातच रुग्णांची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी एका कोविड सेंटरमध्ये म्युझिक थेरपीचा वापर करण्यात आला आहे.
सध्या हा व्हिडियो सोशलवर व्हायरल होत असून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा हा व्हिडियो शेअर करत डॉक्टरांचे कौतुक केले आहे. हा व्हिडियो कर्जत-जामखेडमधील गायकरवाडी येथील आरोळे हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटरचा आहे.
काय आहे रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट
‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण…’
या उक्तीनुसार आरोळे हॉस्पिटलच्या समन्वयक सुलताना शेख यांनी कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी ‘म्युझिक थेरपी’चा यशस्वी वापर केला आणि काही क्षण आजारपण विसरून अनेक रुग्णांची पावलंही झिंगाट गाण्यावर अशी थिरकली! pic.twitter.com/hr9UIyiI9h
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 17, 2021