नवी दिल्ली – मंकीपॉक्स विषाणूने बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन आणि ब्रिटन या नऊ युरोपीय देशांना चिंतेत टाकले आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्येही या विषाणूची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. त्याचा धोका लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शुक्रवारी मंकीपॉक्स व्हायरसवर तातडीची बैठक घेतली.
एजन्सीच्या उच्च अधिकाऱ्याने इशारा दिला आहे की, मंकीपॉक्सची प्रकरणे वाढू शकतात. जसजसा उष्णता वाढत आहे, तसतसे सण आणि पार्ट्यांनाही गर्दी होणार आहे, त्यामुळे त्याचा प्रसार होऊ शकतो. एएफपी या वृत्तसंस्थेने डब्ल्यूएचओचे युरोपचे क्षेत्रीय संचालक हॅन्स क्लुगे यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
सध्या भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, मात्र इतर देशांतील प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. या सूचनेनंतर राज्याच्या आरोग्य विभागाने मंकीपॉक्सबाबत अॅडव्हायझरीही जारी केली आहे. या सूचनेनंतर राज्याच्या आरोग्य विभागाने मंकीपॉक्सबाबत अॅडव्हायझरी म्हणजेच मार्गदर्शक तत्वेही जारी केली आहे.
महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने मंकीपॉक्स संदर्भात मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे ती पुढील प्रमाणे…
-गेल्या 21 दिवसांत प्रभावित देशांमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व संशयित रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल.
-या संशयित रुग्णांची माहिती स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने आरोग्य विभागाला देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
– एंडेमिक आणि नॉन एंडेमिक नसलेल्या देशांतील प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जात आहे.
-अशा रूग्णांवर उपचार करताना सर्व संसर्ग नियंत्रण पद्धती पाळल्या पाहिजेत.
-रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केले जाईल.
-रक्ताची थुंकी आणि संशयित रुग्णांचे नमुने एनआयव्ही पुणे येथे तपासणीसाठी पाठवले जातील.
-मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला असून तेथे २८ खाटा ठेवण्यात आल्या आहेत.
-संशयित रुग्णांचे नमुने एनआयव्ही पुणे येथे पाठवले जातील.
-गेल्या 21 दिवसात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना ताबडतोब ओळखावे लागेल आणि त्यांना वेगळे करावे लागेल.
-जोपर्यंत संशयित रुग्णांच्या सर्व जखमा बऱ्या होत नाहीत आणि त्वचेचा एक नवीन थर तयार होत नाही तोपर्यंत आइसोलेशन संपवता येत नाही आणि तोपर्यंत क्वारंटाइन ठेवणे आवश्यक आहे.