राजकोट: भावा-बहिणीच्या पवित्र नात्यांचा सण म्हणजे रक्षाबंधन हा अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. याच रक्षाबंधनासाठी सर्वात आकर्षक राखी आपल्या भावाच्या हाती बांधता यावी यासाठी बहिणी धडपड करत असतात. अशाच बहिणींसाठी बाजारात सोन्या-चांदीच्या राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत.
रक्षाबंधनाच्या सणापूर्वी गुजरातच्या राजकोटमधील ज्वेलर्सनी यावर्षी शुद्ध सोन्या -चांदीच्या राख्या बाजारात आणल्या आहेत. 22 कॅरेट सोन्याने सोन्याच्या राख्या बनवण्यात आल्या आहेत, असे ज्वेलर सिद्धार्थ साहोलीया यांनी सांगितले.
Gujarat: Jewellers launch gold & silver rakhis in Rajkot this year
“We’re offering more than 50 designs in silver & 15 designs in gold segments. The weight of gold rakhis is between 1-gram & 1.5-gram. Silver rakhis cost Rs 150-Rs 550,” jeweller Siddharth Saholiya said yesterday pic.twitter.com/dUDCkmW1a1
— ANI (@ANI) August 1, 2021
“आम्ही चांदीच्या 50 हून अधिक डिझाईन्स आणि सोन्याच्या विभागात 15 डिझाईन्स देत आहोत. सोन्याच्या राख्यांचे वजन 1 ग्रॅम ते 1.5 ग्रॅम दरम्यान असते. चांदीच्या राख्यांची किंमत 150 ते 550 रुपये असते,” ते पुढे म्हणाले. राजकोट सोन्याच्या दागिन्यांचे केंद्र असल्याने इतर राज्यांतून अशा राख्यांना लक्षणीय मागणी आहे.
“राजस्थान व्यतिरिक्त महाराष्ट्र आणि दिल्ली येथून सुवर्ण राख्यांची मागणी केली जात आहे. लोकांना नवीन संकल्पना आवडत आहे,” असे साहोलीया म्हणाले. सोन्याच्या राख्यांची किंमत 6,000 ते 10,000 रुपयांपर्यंत आहे.
या राख्या सुंदर कोरलेल्या लाकडी पेट्यांमध्ये उपलब्ध आहेत ज्यात ड्राय फ्रूट्स, चॉकलेट्स आणि इतर साहित्य देखील समाविष्ट आहे.