अरे बापरे! मध्यप्रदेशमधील शेतकऱ्याने पिकवला तब्बल अडीच लाख रुपये किलोचा आंबा

आंब्याच्या रक्षणासाठी सुरक्षारक्षक आणि शिकारी कुत्र्यांची फौज तैनात
जबलपूर : आंबा हा फळांचा राजा मानला जातो आणि आंब्याची किंमत नेहमीच जास्त असते. पण जबलपूरमधील एका शेतकऱ्याने पिकवलेल्या आंब्याची किंमत चक्क एक किलो साठी अडीच लाख रुपयांपर्यंत गेली आहे. या आंब्याच्या झाडांच्या रक्षणसाठी त्यांना सुरक्षारक्षक आणि शिकारी कुत्र्यांची फौजही तैनात केली आहे.

भारतात आंब्याच्या अनेक जाती आहेत. जबलपूरमधील एका फार्महाऊसवर शेतकऱ्यांना पिकवलेल्या या आंब्याची जात जपानी असून त्याचे नाव डायगोनो टाम्यागो असे आहे.  या जातीचा आंबा आपण अडीच लाख रुपये किलो या दराने विकला असल्याचा दावा या फार्मच्या संचालकांनी केला आहे. तर इतर व्यापारी मात्र या आंब्यासाठी एकवीस हजार रुपये किलो हा भाव देण्यास तयार आहेत.

जबलपूरमधील संकल्पसिंग आणि त्याच्या परिवाराने आपल्या बारा एकरचा फार्म हाऊसमध्ये हा दुनियेतील सर्वात महाग आंबा पिकवला आहे. या फार्महाऊसमध्ये संकल्प सिंगने विविध 14 जातींचे आंबे पिकले असून त्यापैकी या जपानी जातीच्या आंब्याला सर्वात जास्त भाव मिळाला, असा दावा त्याने केला.

या झाडांच्या रक्षणासाठी संकल्पने चार सुरक्षारक्षक आणि सहा शिकारी कुत्र्यांची फौजच तयार केली असून हे सर्वजण सतत या आंब्याच्या झाडांवर नजर ठेवत असतात. सिंग यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जपानमध्ये पॉलिहाऊसमध्ये या आंब्याची रोपे तयार केली जातात. त्यांनी हे रोप चेन्नईमधून अडीच हजार रुपयांना खरेदी केलं होतं. जपानमध्ये या आंब्याला एग ऑफ सन म्हणजे सूर्याचे अंडे असे म्हटले जाते कारण या आंब्याचा आकार साधारण अंड्यासारखा आणि रंग उगवत्या सूर्यासारखा लालसर असतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.