वाघोली – शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण भागातील इ ५ वी ते ७ वी व शहरी भागातील इ. ८ वी ते १२ वी चे वर्ग ऑफ लाईन पद्धतीने प्रत्यक्ष सुरु करण्यात आले असून वाघोली, आव्हाळवाडी येथे विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
वाघोली तालुका हवेली येथील विष्णूजी शेकोजी सातव हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना मास्क व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांनी स्वागत केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी हवेली तालुका भाजप चे उपाध्यक्ष प्रदिपदादा सातव पाटील,युवा मोर्चा उपाध्यक्ष गणेश सातव, हवेली तालुका क्रीडा आघाडीचे अध्यक्ष विजय जाचक,विलास विर, एन .के. निंबाळकर, प्राचार्य कळमकर सर आदी मान्यवर उपस्थित होते.
तर जि.प प्राथमिक शाळा आव्हाळवाडी येथे सर्व नियमांचे पालन करून इ. ५ वी ते ७वी चे वर्ग सुरु करण्यात आले या प्रसंगी मुलांना मास्क व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांनी स्वागत केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी भाजपा प्रदेश युवा मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश कुटे, आव्हाळवाडी गावच्या सरपंच ललिता आव्हाळे, युवा मोर्चा उपाध्यक्ष शरदराव आव्हाळे, माजी उपसरपंच विक्रम कुटे, आव्हाळवाडी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष पोपट महाराज आव्हाळे, उदयोजक सतीश विठ्ठल आव्हाळे, मोहनराव शिंदे, साळवे सर सर्व शिक्षक उपस्थित होते.
“शासनाच्या नियमाचे शाळांकडून तंतोतंत पालन केले जात असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिले जात आहे. पालकांनीदेखील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ न देण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवून सहकार्य करावे.” – गणेश कुटे (सदस्य ,भाजप युवा मोर्चा राज्य कार्यकारिणी)