रूपे कार्डवर ऑफलाइन पेमेंट्‌स सेवा

रिलोडेबल वॉलेटमुळे रिटेल व्यवहार करणे शक्‍य

मुंबई – नॅशनल पेमेंट्‌स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) रूपे कॉन्टॅक्‍टलेस (ऑफलाइन) सुविधा लॉंच केली असून त्यामुळे रूपे कार्डावर रिलोडेबल वॉलेट उपलब्ध होते. एनपीसीआयने रिटेल पेमेंट्‌ससाठी प्रायोगिक तत्त्वावर रूपे कॉन्टॅक्‍टलेस (ऑफलाइन) सेवा सुरू केली आहे. 

रिलोडेबल वॉलेटच्या मदतीने ग्राहकांना त्यात पैसे शिल्लक ठेवता येतील आणि पीओएस मशिन्सची कनेक्‍टिव्हिटी खराब असतानाही व्यवहार करता येतील. रूपे एसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड) ऑफलाइन वॉलेट मेट्रोज, बस तिकिट्‌स, कॅबचे शुल्क अशा प्रकारच्या तिकिटांचे पैसे कॅशलेस पद्धतीने भरण्यासाठी वापरता येईल.

हे व्यवहार कार्डाद्वारे केल्या जाणाऱ्या नेहमीच्या व्यवहारांपेक्षा जलद होतील. ही सुविधा व्यापाऱ्यांसाठी उपयोगी ठरेल. कारण त्यामुळे टॅप अँड गो मोडवरील प्रत्यक्ष पेमेंट्‌सचा वेळ कमी होईल आणि खराब नेटवर्क कव्हरेज असलेल्या ठिकाणी या सुविधेच्या सोप्या स्वीकारार्ह पायाभूत सुविधांमुळे पेमेंट्‌स सहजपणे होतील.

एनपीसीआयच्या रूपे आणि एनएफएसचे प्रमुख नलीन बन्सल म्हणाले, रूपे कॉन्टॅक्‍टलेस (ऑफलाइन) सुविधेमुळे रूपेसाठीच्या स्वीकारार्ह पायाभूत सुविधा वाढतील आणि पर्यायाने देशाच्या विविध ठिकाणचे व्यापारी व ग्राहकांकडून त्याचा वापर वाढेल. कॉन्टॅक्‍टलेस पेमेंट्‌सची व्यवहार मर्यादा वाढवण्याच्या नुकत्याच करण्याच आलेल्या घोषणेमुळे ग्राहकांना अतिरिक्‍त सुरक्षा व सोय अनुभवता येईल.

रूपे कॉन्टॅक्‍टलेस ऑफलाइन सुविधा आर्थिक सर्वसमावेशकतेला बळकटी देईल आणि कमीत कमी रोखीवर आधारित अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत होईल. या सुविधेमुळे ग्राहकांना स्वीकारार्हतेचे नवे पर्याय उपलब्ध होतील व रूपेचे नेटवर्क देशात खोलवर रूजण्यास मदत होईल. त्याचबरोबर डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारले जाऊ शकेल. भारत सरकार त्यासाठी गेल्या काही काळापासून प्रयत्न करीत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.