‘अधिकाऱ्यांनी चार भिंतीच्या आत बोलावे’ : प्रवीण दरेकर

पिंपरी – भाजप सरकारच्या काळात त्रास झाला, असे वक्तव्य राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक, नेत्रतज्ज्ञ व पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले. त्याबाबत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी अधिकाऱ्यांनी चार भिंतीच्या आत बोलावे, असे म्हंटले आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले, त्यांच्यासारख्या अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारच्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती. राजकारणात सत्ताधारी किंवा विरोधक जाहीररित्या एकमेकांची उणीदुणी काढतात. त्याप्रमाणे प्रशासनातील अधिकाऱ्याने सरकारमधील उणीदुणी बाहेर काढणे शोभा देणारे नाही. अशा प्रकारचे वक्तव्य करणे योग्य नाही. लहाने यांनी चार भिंतींच्या आत बोलायला पाहिजे. लहाने यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता, अशी आठवणही दरेकर यांनी करून दिली.

दरम्यान, भाजप सरकारने खूप त्रास दिला पण आता आघाडी सरकार आल्यानंतर माझी बाजू मांडून मला शासन स्तरावर काम करण्याची संधी दिली.’ असं मत व्यक्त करत तात्याराव लहाने यांनी  फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.