मुंबई – सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवीन प्रयोग होत आहे. ‘पुष्पक विमान’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘देऊळ बंद’ लागोपाठ वैविध्यपूर्ण भूमिकांमधून अभिनेते ‘मोहन जोशी’ प्रेक्षकांसमोर आले होते. गेली अनेक वर्ष हिंदी-मराठी चित्रपटांमधून मोहन जोशी यांनी विविध भूमिका रंगवल्या आहेत.
दरम्यान, लवकरच आपल्या आगामी ‘सिनियर सिटीझन’ चित्रपटातून मोहन जोशी प्रेक्षांसमोर येणार आहे. नुकतंच ‘सिनियर सिटीझन’ चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर रिलीज करण्यात आहे. ट्रेलर मध्ये मोहन जोशी यांचा हटके आणि बिंधास अंदाज दिसून येत आहे.
‘सिनियर सिटीझन’ हा चित्रपट अजय फणसेकर दिग्दर्शित असून ॐ क्रिएशन्सच्या माधुरी नागानंद, विजयकुमार नारंग यांची निर्मिती केली आहे.