‘एक होतं माळीण’ चित्रपटाचा ऑफिशल टिझर रिलीज

30 जुलै 2014 रोजी एका गावावर ओढावलेला तो काळा दिवस म्हणजे ‘एक होतं माळीण’. मात्र, त्या काळ रात्रीची घटना सांगणारा वास्तववादी चित्रपट ‘एक होतं माळीण’ लवकरच आता रुपेरी पडद्यावर येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ऑफिशल टिझर रिलीज झाला असून, लवकरच हा चित्रपट रुपेरी पडद्यावर येणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचं पोस्टर सुद्धा प्रदर्शित करण्यात आले होते.

पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यामधील माळीण गावावर (30 जुलै 2014 रोजी) सकाळी आठच्या सुमारास गावकरी गाढ झोपेत असतानाच, काळानं निर्दयी झडप घातली. मुसळधार पावसामुळं डोंगरकडा कोसळून माळीण गावातली 44 घरं ढिगाऱ्यात गाडली गेली आणि सुमारे 725 वस्तीचं हे गाव होत्याचं नव्हतं झालं. या दुर्घटनेत अनेक नागरिकांचे बळी गेले असून, माळीण गावावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला होता.

 

View this post on Instagram

 

30 जुलै 2014 रोजी सकाळी 8.15 मिनिटांनी काळाने घात केला, आणि हसत खेळत असलेलं माळीण गाव डोंगरखाली उध्वस्त झालं. मनाला चटका लावणाऱ्या या दुर्घटनेवर आधारित येणाऱ्या “एक होतं माळीण” मराठी चित्रपटाचा पहिला टिझर पोस्टर समस्त माळीण वासियांना समर्पित… 🙏 Produced By – Santosh Jagannath Mhatre Written & Directed By – Datta Gaikar & Raju Rane @ekhotamalin @siddh__siddh #ekhotamalin #marathifilm #comingsoon

A post shared by Ek Hota Malin (@ek_hota_malin) on

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)