#पुन्हानिवडणूक या हॅशटॅगमागचे उत्तर सापडले
मुंबई – गेल्या काही दिवसांपूर्वी मराठी कलाकारांकडून सोशल मीडियावर “#पुन्हानिवडणूक” असं ट्विट करण्यात आलं होतं. निवडणुकी नंतर राज्यात कोणताही पक्ष सत्तास्थापन करू न शकल्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.
अश्यातच अभिनेत्री सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अकुंश चौधरी, सिद्धार्थ जाधव अशा अनेक कलाकारांनी एकाचवेळी ट्विटरवर #पुन्हानिवडणूक असं ट्विट केलं होतं. कलाकारांच्या या ट्विट मुळे अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या.
दरम्यान, आता #पुन्हानिवडणूक या हॅशटॅगमागचे उत्तर सापडले. #पुन्हानिवडणूक हॅशटॅग हा ‘धुरळा’ चित्रपटाचा प्रमोशनचा एक भाग होता. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींशी त्याचा काहीही संबंध नसल्याचेही पूर्ण पणे स्पष्ट झाले आहे.
नुकतंच ‘धुराळा’ चित्रपटाचा ऑफिशल टिझर प्रदर्शित झाला असून, हा चित्रपट राजकारणाशी निगडित आहे. अस्सल गावाकडच्या मातीत मुरलेलं राजकारण, निवडणुकांची रणधुमाळी आणि या सत्तेच्या या खेळात एकमेकांवर कुरघोडी करताना उडालेला राजकारणाचा ‘धुरळा’ हे सगळेच पैलू या टीझरमध्ये दिसून येतात. ३ जानेवारी २०२० मध्ये हा चित्रपट सिने रसिकांच्या भेटीला येणार आहे.