अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे पदाधिकारी संतापले

आकडे बोलतात अधिकाऱ्यांची गैरहजेरी

माण पंचायत समितीच्या मासिक सभेला अनुपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्यांच्या नावापुढे गैरहजेरीच्या वेळा. उप अभियंता सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र शासन 3, सहायक अभियंता श्रेणी (1) गोंदवले पाटबंधारे विभाग 6 , उप अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण 3, सहायक अभियंता महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण उपविभाग वडूज 6, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय दहिवडी 3, वन क्षेत्रपाल सामाजिक वनीकरण 6, वन क्षेत्रपाल दहिवडी 6, आगार प्रमुख दहिवडी 5, तालुका कृषी अधिकारी 4, अधीक्षक भूमि अभिलेख 5, सचिव खरेदी विक्री संघ 6, सहायक निबंधक 6, सचिव खादी ग्रामोद्यग 4, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती दहिवडी 6.

मलवडी – टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर घेण्यात आलेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेला 32 पैकी 23 खातेप्रमुख गैरहजर असल्यामुळे संतप्त झालेल्या सभापती, उपसभापतींसह सदस्यांनी मासिक सभा रद्द केली. गैरहजर गट विकास अधिकाऱ्यासंह 22 खातेप्रमुखांवर कठोर कारवाई झाल्याशिवाय यापुढे मासिक सभा न घेण्याचा निर्णय उपस्थित सदस्यांनी एकमुखी घेतला. या सभेस सभापती रमेश पाटोळे, उपसभापती नितीन राजगे, सदस्य तानाजी काटकर, लतिका विरकर, रंजना जगदाळे, चंद्राबाई आटपाडकर हे सदस्य उपस्थित होते. यावेळी सभेच्या सुरुवातीलाच मागील महिन्यात दु:खद निधन झालेल्या माजी सभापती वसंतराव जगताप यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

दर महिन्याला पंचायत समितीची मासिक सभा घेण्यात येते. आचारसंहितेमुळे मागील सलग तीन महिने कोणतेही ठराव तसेच टंचाई आढावा घेता आला नव्हता. त्यामुळे टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर आजच्या (गुरूवारी) मासिक सभेला अनन्यसाधारण महत्त्व होते. या बैठकीस सर्व सदस्य व खातेप्रमुखांची उपस्थिती महत्त्वाची होती. बिडीओंच्या सहीने सात दिवसांपूर्वी सभेचे नोटीस काढण्यात आले होते. या सभेस सदस्यांसह बालविकास प्रकल्प अधिकारी, नरेगा, उप अभियंता लघु पाटबंधारे विभाग, कृषी विभाग पं.स. माण, समाजकल्याण व महिला बाल विकास विभाग, ग्रामपंचायत विभाग, गट शिक्षण अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रधानमंत्री आवास विभाग या खात्यांचे खातेप्रमुख उपस्थित होते. बाकी खातेप्रमुखांनी सभेकडे पाठ फिरवल्याने पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

अनुउपस्थित अधिकाऱ्यांची बराच वेळ वाट पाहण्यात आली. मात्र, दुपारी एक वाजल्या तरी अधिकारी आलेच नसल्याने एक वाजता सुरु झालेल्या सभेस स्वतः बिडोओंसह तब्बल 23 खातेप्रमुख सभेस उपस्थित नव्हते. खातेप्रमुखांच्या या बेजबाबदार वागण्यामुळे संतप्त झालेल्या सभापती रमेश पाटोळे यांनी दुपारी दीड वाजता सभा रद्द केली. गैरहजर सर्वच खातेप्रमुखांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा सभापती पाटोळे यांनी दिला. तसेच खातेप्रमुखांच्या बेजबाबदार वर्तुणूकीचा अहवाल वरिष्ठांना पाठवणार असून संबंधितांवर कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे सभापती पाटोळे यांनी सांगितले.

बीडोओंच्या मनमानी कारभाराचा वैताग
“गट विकास अधिकारी गोरख शेलार यांच्या मनमानी कारभाराला सदस्य वैतागले आहेत. त्यांची बदली झाल्याशिवाय तसेच गैरहजर कर्मचाऱ्यांवर काय कारवाई केली हे आम्हाला दाखविल्याशिवाय यापुढे मासिक सभा घेतली जाणार नाही.

– नितीन राजगे, उपसभापती पंचायत समिती माण.

आमदारांच्या बैठकीमुळे ….
“सभागृहाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. आमदार जयकुमार गोरे यांनी टंचाई संदर्भात सकाळी अकरा वाजता शासकीय विश्रामगृहात बैठक बोलवली होती. सदर बैठकीस वेळ लागला. मी सभेसाठी सचिवाची नेमणूक केली होती व वेळ लागेल याची कल्पना सभापतींना दिली होती.

– गोरख शेलार, गट विकास अधिकारी, माण.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.