राजीव गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; शिक्षकांनी साधला मोदींवर निशाणा 

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका प्रचार सभेत बोलताना राहुल व प्रियांकांचे वडिल दिवंगत राजीव गांधी यांच्यावर एक आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. स्वता:ला मिस्टर क्‍लीन म्हणणारे पंतप्रधान एक नंबरचे भ्रष्टाचारी ठरले असे विधान मोदी यांनी केले होते. यावर काँग्रेसकडून तीव्र टीका करण्यात अली होती. याप्रकरणी आता दिल्ली विद्यापीठाच्या २०० पेक्षा अधिक शिक्षकांनी मोदींचा निषेध केला आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी आज ट्विट करून याबाबत माहिती दिली. राजीव गांधींना भ्रष्ट म्हणण्यात आल्याने दिल्ली विद्यापीठाच्या शिक्षकांनी मोदींना एक निंदनीय पत्र लिहले आहे. यावर २०० पेक्षा अधिक शिक्षकांनी सह्या केल्या आहेत.

दरम्यान, याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर टीका करताना म्हंटले कि, मोदीजी आता लढाई संपली आहे आता आपल्या कर्माची फळे भोगण्यास तयार राहा. आपल्या मनातील जळजळ तुम्ही माझ्या वडिलांवर काढली असली तरी त्यातून तुमचे रक्षण होणार नाही. माझे तुम्हाला प्रेमाचे अलिंगनच राहील असे त्यांनी म्हटले आहे. तर प्रियांका गांधी यांनी आपल्या ट्विटरवर म्हटले आहे की शहीद जवानांच्या नावाने मते मागून राजकारण करणाऱ्या मोदींनी काल एका महान नेत्याच्या बलिदानाचा अवमान केला आहे. अमेठीचे मतदार त्यांच्या या विधानाला चोख प्रत्युत्तर देतील. राजीव गांधी यांनी आपले सारे जीवन अमेठीसाठी दिले होते. मोदीची या देशातील जनता असा अवमान कधीच विसरत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.