जनावरे मोकाट सोडणाऱ्या सहा जणांविरूद्ध गुन्हा

महिलांना सहायक केंद्राध्यक्षपदाची, तर बीएलओंना निवडणुकीची ड्यूटी मानधनातही दुजाभाव

नगर – महापालिका प्रशासनाने मोकाट सोडलेल्या जनावरांच्या मालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. जनावरे रस्त्यावर सोडून रहदारीला अडथळा आणल्याप्रकरणी सहा जणांवरांच्या मालकांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तू छगनराव गोंधळे, रवी दगडू गवळी, अशोक सूर्यभान निस्ताने, संताराम छगनराव घुले, माधू भागोजी गोडळकर (सर्व रा.गवळीवाडा, जिल्हा रुग्णालया जवळ) व इक्‍बाल आयुब खान (रा.मिसगर कॉलनी, लालटाकी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्रकार चौक ते सर्जेपुरा चौक दरम्यान रस्त्यावर मोकाट जनावरांचा मोठा वावर असतो. जवळच असलेल्या परिसरातील नागरिकांच्या मालकीची ही जनावरे मोकळी सोडण्यात येतात. त्यामुळे रहदारी अडथळा निर्माण होतो. रस्त्यांवर अस्वच्छताही होते. जनावरे नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, अशी फिर्याद महानगरपालिकेचे अधिकारी प्रशांत रामदीन यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.