के. के. रेंजवर रंगला युद्धाचा थरार

नगर – नगरजवळील के. के. रेंज लष्काराच्या युद्ध सराव क्षेत्रावर सोमवारी तब्बल दोन तास सैनिकांचा युद्ध सराव रंगला. लष्कराची युध्दनिती, शस्त्र वापरण्याचे कौशल्य, शत्रुंवर चाल करुन जाणारे रणगाडे, कानठळ्या बसवणाऱ्या तोफांचा मारा, गोळीबार असा हा युद्ध भूमीवरचा रोमांचककारी थरार के. के. रेंज येथे लष्कराच्या प्रात्यक्षिकांमध्ये पहावयास मिळाला.

या युद्ध सरावामध्ये घातक टी 90 रणगाडा प्रमुख आकर्षण ठरला. के. के. रेंज या युद्ध सराव भूमीवर मेजर जनरल नीरज कपूर, ब्रिगेडियर व्ही व्ही सुब्रमन्यम यांच्या मार्गदर्शनाखाली आर्मड कॉर्प्स सेंटर व स्कूल, मॅकेनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट सेंटर यांच्यावतीने भारताच्या मित्र राष्ट्राचे सैन्य आणि देशभरातील निमंत्रितांसमोर युद्ध प्रात्यक्षिकांचा थरार रंगला. लष्कराचा हा युद्ध सराव दोन तास सुरू होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रणगाड्यांमधून तोफांचा मारा, गोळीबार, हेलीकॉप्टर यांची प्रात्यक्षिके रंगली. या प्रात्यक्षिकानंतर उपस्थितांना जवळून रणगाडे, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी देण्यात आली. सुरूवातीला रणगाड्यांमधून आगीचे लोळ सोडीत शत्रूच्या काही क्षणात भस्मसात करणाऱ्या तोफांचा मारा करण्यात आला. कानठळ्या बसविणाऱ्या तोफा रणगाड्यांमधून आगीचा लोळ ओकत बाहेर पडताच उपस्थितांचा थरकाप उडत होता. अत्याधुनिक टी 90 व टी 72 रणगाड्यांच्या प्रात्यक्षिकाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. लष्करी प्रात्यक्षिकामध्ये रणगाडे व हेलिकॉप्टर हे मुख्य आकर्षण ठरले. युद्ध भूमीचा रोमांच पाहून भारताच्या मित्र राष्ट्राचे सैन्य आणि देशभरातील निमंत्रित अवाक्‌ झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)