भुवनेश्वर, दि. 21 – प्रख्यात ओडिसी नृत्यांगना लक्ष्मीप्रिया मोहपात्रा यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 86 वर्षांच्या होत्या. दिवंगत ओडिसी नर्तक केलुचरण मोहपात्र यांच्या त्या पत्नी होत. त्यांनी बालपणापासूनच ओडिसी नृत्यांचे धडे घेतले.
विवाहानंतर मात्र त्यांनी नृत्य सोडून दिले. पण त्यांचा या विषयीचा अभ्यास दांडगा होता व त्यांनी अनेक नवोदितांना मार्गदर्शनही केले आहे. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली आहे.
ओडिसी नृत्य परंपरेची त्यांनी जपणूक करीत त्याला सतत प्रोत्साहन दिले असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे. त्यांच्यावर पुरीतील स्वारगदवार येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शास्त्रीय संगीत व नृत्य क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.