वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदार संघ असणाऱ्या वाराणसीत प्रदुषणाची पातळी कमालीची वाढली आहे. त्यामुळे या पवित्र शहरातील भक्तांनी चक्क देवतांनाच प्रदुषण मास्क लावले आहेत. त्याची जोरदार चर्चा देशभर सुरू आहे.
सिगरा येथील प्रख्यात शिवपार्वती मंदिरात भगवान शिव, देवी दुर्गा, देवी काली, आणि साईबाबा यांचे मुख मास्कने अच्छादण्यात आले आहेत. वारणसी हे श्रध्देचे स्थान आहे. या मुर्तींना आम्ही जीवंत देवताच मानतो. त्यांना आनंदी आणि आरामदायी वाटावे म्हणून आम्ही परिश्रम घेतो. उन्हाळ्यात त्यांना चंदन उटी लावतो. तर थंडीत लोकरीच्या वस्त्रात गुंडाळतो. तसेच तसेच प्रदुषणाबाबत… आमीः त्यांच्या मुखांना मास्क लावले,असे येथील पुजारी हरीश मिश्रा यांनी सांगितले.
आम्हाला विश्वास आहे तो सुरक्षित तर आम्ही सुरक्षित
वाराणसीतील तर्केश्वर महादेव मंदिरात शिवलिंगाला मास्क लावण्यात आला आहे. त्याबाबत श्रध्दाळू म्हणाले, शहरातील हवा अत्यंत प्रदुषित झाली आहे. भोलाबाबाला या विषारी वायुंपासून वाचवण्यासाठी मास्क लावण्यात आला आहे. लक्षात घ्या तो सुरक्षित तर आम्ही सुरक्षित. काली देवता ही रागीट देवता आहे. त्यामुळे तिने जीभ बाहेर काढली तरी ती झाकली नाही. त्यावर आम्ही मास्क लावला आहे. मात्र तिचा चेहरा न झाकला नाही, असेही त्यांनी सांगितले.
मिश्रा म्हणाले, शहरातील प्रत्येकाने हे प्रदुषण वाढवण्यात हातभार लावला आहे. प्रदुषित हवा लोकांना फटाके उडवण्यापासून परावृत्त करू शकली नाही. त्यामुळे सर्वत्र धुराचे साम्राज्य आहे. पालिकेचे कर्मचारी हे प्रदुषण दूर करण्याऐवजी उघड्यावर कचरा पेटवत आहेत. त्यामुळे हा आक्रोश असूनही प्रत्येक जण या आणीबाणीत सहभाग नोंदवत आहे. जोपर्यंत लोक त्यांच्या सवयी बदलत नाहीत तो पर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही.