ओडिशात सत्ताधारी बीजेडी सरकारच्या धोरणाचा त्यांच्याच माजी आमदाराला फटका

भुवनेश्‍वर – ओडिशा सरकारने भ्रष्टाचाराच्या विरोधात झिरो टॉलरन्सचे धोरण स्वीकारल्यानंतर नवीन धोरणानुसार करण्यात आलेल्या कारवाईचा फटका या पक्षाच्याच माजी आमदाराला बसला आहे. अनाम नाईक असे या बीजेडीच्या माजी आमदाराचे नाव असून त्यांना बेहिशोबी मालमत्ता जमवल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली आहे.

नाईक हे सन 2014 ते 2019 या अवधीत आमदार होते. पण त्यांना यावर्षी झालेल्या निवडणुकीत पुन्हा तिकीट मिळू शकले नव्हते. त्यांच्या अनेक मालमत्तांवर छापे घालून त्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. त्यात तीन इमारती, एक डुप्लेक्‍स लॉज, एक दारूचे दुकान, दोन व्यापारी संकुले, 50 लाखांच्या बॅंक ठेवी, आणि अन्य गुंतवणूक तसेच सोन्या चांदीच्या दागिन्यांचाहीं समावेश आहे. त्यांची ही मालमत्ता त्यांच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतांशी जुळत नसल्याने नवीन धोरणानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here