कोलकता -तिहेरी रेल्वे अपघातात दोन्ही प्रवासी गाड्यांचे (एक्स्प्रेस) इंजिन ड्रायव्हर आणि गार्ड जखमी झाले. मात्र, नशीब बलवत्तर असल्याने मालगाडीच्या इंजिन ड्रायव्हर आणि गार्डला कुठलीही दुखापत झाली नाही. एक्स्प्रेसच्या जखमी इंजिन ड्रायव्हर आणि गार्डवर विविध रूग्णालयांत उपचार सुरू आहेत, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली.
रूग्णालयांवर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर ताण अन् भाषेचीही अडचण दोन अपघातग्रस्त एक्स्प्रेसमध्ये मिळून सुमारे 2 हजार प्रवासी होते. त्यांच्या पैकी अनेक जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयांत हलवण्यात आले.
अचानकपणे मोठ्या संख्येने आणि क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक रूग्ण दाखल झाल्याने त्या रूग्णालयांवर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडला. जखमी विविध राज्यांमधील असल्याने उपचारावेळी संवाद साधताना भाषेची अडचण जाणवली.