ओडिशाच्या मंत्र्यांना दर महिन्याला कामकाज अहवाल बंधनकारक

भुवनेश्‍वर – ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कार्याचे दरमहा कामकाज अहवाल सादर करावा असे बजावले आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने दर महिन्याच्या 7 तारखेला प्रत्येक मंत्र्याने अहवाल सादर करावा असे स्पष्ट केले आहे. नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. या बैठकीत बिजू जनता दलाच्या जाहीरनाम्याची पुढील पाच वर्षांत अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा झाली. विहित कालावधीत प्रकल्प व कामे पूर्ण करण्यावर मंत्र्यांनी भर द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी पूर्वीच्या सरकारच्या 4 टी फॉर्म्युलामध्ये त्यांनी यावेळी टाइमचा समावेश केला. टीमवर्क, टेक्‍नॉलॉजी, ट्रान्स्परन्सी आणि ट्रान्स्फॉर्मेशन हा पूर्वीचा फॉर्म्युला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.