fbpx

लग्नाच्या खुशीत ५०० भटक्या कुत्र्यांना पार्टी!

भूवनेश्वर – भारतात लग्न सोहळा मित्रपरिवारासोबत धुमधडाक्यात साजरा केला जातो. हजारो लोकांच्या पंगती उठतात. मात्र भूवनेश्वरमध्ये एका दाम्पत्याने काहीसा वेगळा विचार केला आणि सगळ्या देशातून त्या दोघांचंं कौतुक होत आहे.

यूरेका आप्टा आणि जोआना वांग या दोघांनी 25 सप्टेंबरला विवाह केला. या विवाहात मित्रमंडळी म्हणून 500 कुत्र्यांना भोजन दिलं. लॉकडाऊनमुळे अनेक प्राण्यांना उपाशी रहावं लागलं होतं.

युरेका आपटा पायलट आणि चित्रपट निर्माते आहे, तर जोआना वांग दंतचिकित्सक आहेत. लग्नाच्या दिवशी, जोडप्यांनी भुवनेश्वरमध्ये 500 पेक्षा जास्त भटक्या कुत्र्यांना खायला देण्यासाठी स्थानिक प्राणी बचाव संस्थेशी संपर्क केला होता. अ‍ॅनिमल वेलफेयर ट्रस्ट एकमारा (एडब्ल्यूटीई) च्या स्वयंसेवकांनी 25 सप्टेंबर रोजी लग्न केले तेव्हा त्यांच्या वतीने भटक्या कुत्र्यांना भोजन दिले.

‘लॉकडाऊनमध्ये, आमच्या एका मित्राने, सुकन्या पतिने अपघातात जखमी झालेल्या भटक्या कुत्र्याला वाचवले. मी, जोआना आम्ही दोघांनी त्याला पशुवैद्यकीय रुग्णालयात भटक्या कुत्र्यावर उपचार केले. नंतर आम्ही तिला अ‍ॅनिमल वेलफेयर ट्रस्ट एकमारा (एडब्ल्यूटीई) कडे नेले ज्या ठिकाणी कुत्र्यांना आसरा दिला जातो, असं आप्टा यांनी सांगितलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.