खळबळजनक! मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना धमकीचे पत्र; पत्रात लिहिलेय, ‘मुख्यमंत्र्यांना ठार मारण्यासाठी…’

भुवनेश्‍वर – ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र पाठवण्यात आले आहे. त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यात त्यांना ठार मारण्याचा पद्धतशीर कट रचण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

हे पत्र इंग्रजी भाषेत लिहीण्यात आले असून त्यात नमूद करण्यात आले आहे की मुख्यमंत्र्यांना ठार मारण्यासाठी भाडोत्री मारेकरी तयार करण्यात आले असून त्यांना आधुनिक शस्त्रे पुरवण्यात आली असून ते केव्हाहीं त्यांच्यावर हल्ला करू शकतात.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सावध राहावे असेही हे पत्र लिहीणाऱ्याने मुख्यमंत्र्यांना सूचित केले आहे. 5 जानेवारीला हे पत्र प्राप्त झाल्यानंतर ते पुढील तपासासाठी गृहविभागाकडे सोपवण्यात आले आहे.या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री व राज्य सचिवालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात येईल अशी माहिती राज्याच्या गृहविभागाचे सचिव संतोष बाला यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.