तिरुअनंतपुरम – केरळमध्ये करोना नियंत्रणात येत असल्याने 14 जिल्ह्यातील रेस्टॉरंट सुरू ठेवण्यास केरळ सरकारने परवानगी दिली आहे. तसेच खासगी वाहनांनाही ऑड-इव्हन नियमाप्रमाणे परवानगी देण्यात येणार आहे. केरळमध्ये मागील आठवड्यात करोनाग्रस्तांची एक अंकी वाढ झाली. तसेच रुग्ण बरे होण्याची संख्याही झपाट्याने वाढली आहे.
केरळमध्ये आतापर्यंत 396 रुग्ण आढळले असून, त्यापैकी 255 लोक बरे झाले आहेत. तर 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील साथ नियंत्रणात आल्याने केरळ सरकारने 21 दिवसांच्या लॉकडाऊननंतर रेड झोन वगळता ऑरेंज ए, ऑरेंज बी आणि ग्रीन झोनमधील प्रतिबंध हटवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. केंद्र सरकारनेही केरळ सरकारचा प्रस्ताव स्वीकारला आहे. त्यामुळे रेड झोन वगळता इतर 14 जिल्ह्यातील प्रतिबंध हळूहळू उठविण्यात येणार आहेत.
आयसोलेशनमध्ये राहूनही करोना पॉझिटीव्ह?
केरळमध्ये दुबईवरून आलेल्या एका व्यक्तीला 29 दिवस आयसोलेशन्मध्ये ठेवण्यात आले होते. मात्र त्यानंतर ही ह्या व्यक्तीचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. हा व्यक्ती आणि त्याचा भाऊ दुबईतून आले होते, त्यानंतर त्यांन्ा क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांच्या वडिलांना बारीक सारीक आजारामुळे रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या संबधित व परिवारातील लोकांची चाचणी केली असता तीनजण करोनाबाधित आढळले होते.