ऑक्‍टोबरचा पगार दिवाळीपूर्वी द्यावा

वाडा -या शैक्षणिक वर्षांत प्रत्येक महिन्याचे पगार वेळेवर होत नाहीत. सप्टेंबर महिन्याचा पगार अजून झालेला नाही. दिवाळीपूर्वी दोन्ही महिन्यांचे पगार व्हावेत, अशी मागणी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांकडून होत आहे.

अनेक शिक्षकांनी गृहकर्ज, वाहनकर्ज व इतर कर्ज काढली आहेत. या कर्जाचे हप्ते पगार वेळेवर होत नसल्याने त्याचा भुर्दंड सहन करावा लागत असतो. तसेच अधिक व्याज द्यावे लागते. दसरा सणालादेखील सप्टेंबर महिन्याचा पगार मिळाला नाही.

यामुळे शिक्षकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून दिवाळीचा सण सुरू होत आहे. दिवाळीसाठी घरातील सर्वांना कपडे खरेदी करावे लागतात. गावी गेल्यावर मुक्त हस्ते खर्च करावा लागतो.

घरातील सर्वांना मोठ्या अपेक्षा असतात, त्या पूर्ण करण्यासाठी पगार वेळेवर उपलब्ध करून देण्यात यावे. इतर कर्मचाऱ्यांना दिवाळीत बोनस मिळत असतो पण शिक्षकांना त्यांचा नियमित पगार वेळेवर मिळावा, अशी अपेक्षा आहे. त्यांची दिवाळी साजरी होईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.