सोलापूर: सांगोला तालुक्यातील महुद येथे नीरा उजवा कालव्यावरील वितरके जवळील गवत काढत असताना सरकारी कामात अडथळा तसेच शाखा अभियंता आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत वर दगडफेक करण्यात आली. हा प्रकार सोमवारी घडला आहे. याबाबत शाखा अभियंता अभिजीत मेहेत्रे यांनी सांगोला पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून महुद येथील सोमनाथ जाधव, सुनील नागणे, समाधान जाधव यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.