टीव्ही अभिनेत्रीच्या व्हॉट्सअॅपवरून अश्लील व्हिडीओ कॉल्स; अकाउंट हॅक

टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक झाले आहे. अभिनेत्रीने स्वतः याबाबतची माहिती दिली आहे. तसेच आरोपी अकाउंटवरून अश्लील व्हिडीओ कॉल करत असल्याचेही तेजस्वीने म्हंटले आहे.

एका मुलाखतीत तेजस्वीने म्हंटले कि, ज्या व्यक्तीने माझा फोन हॅक केला आहे. तो माझ्या कॉन्टक्टमधील व्यक्तींशी अतिशय मैत्रींपूर्ण संवाद साधत आहे. यासोबतच तो एक लिंक शेअर करत आहे. आणि त्यांना कोड पाठविण्यासाठी सांगत आहे. समोरच्या व्यक्तीने व्हॉट्सअॅप कोड पाठवल्यावर आरोपी व्हिडीओ कॉल करतो आणि हा कॉल उचलल्यावर एक व्यक्ती अश्लील कृती तुमच्यासमोर करतो, असे तिने म्हंटले आहे.

 

View this post on Instagram

 

There is always a reason to smile… Find it . . #gratitude #peace #passion

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash) on

तेजस्वी पुढे म्हणाली, काल मी मीरा रस्त्यावरील कलर्स टीव्हीच्या शोच्या चित्रीकरणात व्यस्त होते. तेव्हा अचानक मला व्हिडीओ कॉल आला. मी व्हिडीओ कॉल उचलल्यानंतर समोरून एक न्यूड व्यक्ती उभा असलेला दिसला. ते पाहून मी घाबरले. अशाच प्रकारचे कॉल्स इंडस्ट्रीमधील माझ्या मित्र-मैत्रिणींना आले आहेत. मला करिष्मा तन्ना, तान्या शर्मासहित अनेक लोकांनी कॉल केला. ते सर्व जण प्रकाराने शॉक झाले होते.

 

View this post on Instagram

 

Shadi ho toh aisi ❤️ . . Outfit @kalkifashion

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash) on

मी सायबर सेलमध्येही कॉल केला होता. त्यांनी मला नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यास सांगितली आहे. परंतु, रात्री तीन वाजपर्यंत मी कामात असल्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकले नाही. तरीही मी लवकरच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार आहे, असे तिने सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)