पंकजा मुंडेंविरोधात आक्षेपार्ह वक्‍तव्य धनंजय मुंडेंविरोधात “एफआयआर’ दाखल

बीड- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर चुलतबहिण आणि महाराष्ट्रातील मंत्री पंकजा मुंडे यांच्याविरोधात निवडणुकीच्या सभेत अश्‍लील वक्‍तव्य केल्याप्रकरणी “एफआयआर’ दाखल करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही व्हिडिओ क्‍लिप बनावट आहे आणि त्यांची वक्‍तव्य विपर्यास केलेले आहे, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले. शनिवारी रात्री उशिरा फेसबुकवरच्या पोस्टमध्ये धनंजय मुंडे यांनी या क्‍लिपच्या सत्यतेची तपासणी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत करण्याची मागणी केली आहे.

परळी भाजपचे अध्यक्ष जुगल किशोर लोहिया यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शनिवारी रात्री धनंजय मुंडे यांच्याविरूद्ध भारतीय दंड संहितेतील मानहानि, शब्द, हावभाव किंवा एखाद्या महिलेचा विनयभंग करण्याचा हेतूने सार्वजनिक ठिकाणी अश्‍लील कृत्य आदी गुन्ह्यांच्या कलमांखाली “एफआयआर’ दाखल करण्यात आली आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. धनंजय मुंडे यांनी 17 ऑक्‍टोबर रोजी केज तालुक्‍यातील विडा गावात झालेल्या जाहीर सभेत भाजपच्या मंत्र्यांविरूद्ध अश्‍लील टीका केली, असे लोहिया यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांच्या आक्षेपार्ह वक्‍तव्याविरोधात भाजपने निवडणूक आयोग आणि महिला आयोगाकडेही तक्रार केली आहे.
सोमवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही चुलत भाऊ-बहीण परळी मतदारसंघामध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.