कोविशील्ड नव्हे तर भारताच्या लसीकरण प्रमाणपत्राला आक्षेप – ब्रिटनचे आडमुठे धोरण कायम

नवी दिल्ली – भारताने लस मान्यतेबाबत घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर इंग्लंडने आपल्या प्रवासी धोरणामध्ये बदल केले आहेत. सुधारित नियमांमध्ये कोव्हीशील्ड लसीला मान्यता देण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी ब्रिटनच्या आडमुठ्या धोरणामुळे भारतामध्ये कोव्हीशील्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना देखील इंग्लंडमध्ये गेल्यानंतर क्वारंटाईन होणे अद्यापही सक्तीचे असणार आहे.

याबाबत इंग्लंड येथील संबंधित अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देताना, ‘आम्हाला भारतात दिल्या जाणाऱ्या कोव्हीशील्ड लसीबाबत आपत्ती नसून भारतच्या लसीकरण प्रमाणपत्राबाबत शंका  आहे.’ असं सांगितलं.

‘अ‍ॅस्ट्राजेनिका कोविशिल्ड, अ‍ॅस्ट्राजेनिका व्हॅक्झिर्विया आणि मडोर्ना टेकीडा या लसींना मान्यता देण्यात आलीय.’ असं इंग्लंडच्या सुधारित प्रवासी धोरणामध्ये म्हंटलंय. ‘४ ऑक्टोबर पहाटे ४ पासून काही विशिष्ट देशांतील सार्वजनिक आरोग्य संस्थेच्या माध्यमातून ज्यांनी लस घेतली आहे त्यांचे लसीकरण पूर्ण झालं असल्याचं ग्राह्य धरण्यात येईल’ असं देखील सुधारित धोरणांमध्ये म्हंटलं आहे.

मात्र प्रवासी धोरणाद्वारे देण्यात आलेल्या देशांच्या यादीमध्ये भारताचे नाव नसल्याने कोव्हीशील्डचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीयांना देखील क्वारंटाईन राहावे लागणार आहे.

ब्रिटिश हाय कमिशनने याबाबत सोमवारी जारी केलेल्या पत्रकामध्ये, भारताच्या करोना लसीकरण प्रमाणपत्राला मान्यता देण्यासंदर्भात भारताशी चर्चा सुरु असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, भारतामध्ये को-विन ऍपच्या माध्यमातून केंद्रीकृत (सेंट्रलाइझ्ड) पद्धतीने लसीकरण मोहीम सुरु आहे. याच माध्यमातून लसीकरण प्रमाणपत्र देखील वितरित करण्यात येते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.