भोपाळ – महाराष्ट्राच्या पाठोपाठ सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेशातीलही ओबीसी आरक्षणा शिवाय तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घ्या असा आदेश काल दिला. त्यामुळे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आपला विदेश दौरा रद्द केला आहे. ते पुढील आठवड्यात न्युयॉर्क आणि लंडनला जाणार होते.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेश या भाजपशासित राज्यातलेही ओबीसी आरक्षण रद्द केल्याने भाजपला मात्र चांगलाच दणका बसला आहे. या प्रकरणावरून भाजपने महाराष्ट्रात जो आरडाओरडा सुरू केला होता त्याची या निमीत्ताने पोलखोल झाली आहे अशी टीका विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर होऊ लागली आहे.
पुर्ण छाननी झाल्याशिवाय ओबीसींना राजकीय आरक्षण दिले जाऊ नये अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. दरम्यान या निकालावर आपण सर्वोच्च न्यायालात लवकरच फेरआढावा घेण्याची मागणी करणारी याचिका सादर करू असे मुख्यमंत्री चौहान यांनी म्हटले आहे.