मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळाले होते. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम होता. अखेर आज देवेंद्र फडणवीस यांच्या गळयात मुख्यमंत्री पदाची माळ पडली आहे. उद्या महायुती सरकारचा ग्रँड शपथविधी सोहळा संध्याकाळी पार पडणार आहे. मात्र या शपथविधी सोहळ्यात फडणवीस यांच्यासोबत कोण कोण शपथ घेणार याबद्दल सस्पेन्स अजूनही कायम आहे.
इच्छुक मंत्र्यांनी केली ‘ही’ मागणी
महायुतीत तीन पक्षांच्या नेत्यांवर पक्षांतर्गत मागणी समोर आली आहे.गुरुवारी आझाद मैदानावर शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर होणार आहे. त्यामुळे किमान प्रत्येकी भाजपमधील १० तसंच शिवसेना, राष्ट्रवादी पक्षातील प्रत्येकी ५-५ असे 20 लोकांचा शपथविधी यावेळी घेण्यात यावा भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांकडे अनेक आमदारांनी केली आहे.
मंत्रिमंडळ शपथविधीत इतर कॅबिनेट मंत्री यांचा समावेश करावा. सध्या एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा शपथविधी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीन पक्षातील मंत्रिपदासाठी इच्छुक यांच्यात नाराजी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शपथविधीत जास्त मंत्री शपथ व्हावे यासाठी आज रात्री महायुती चर्चा करून भाजपा पक्ष श्रेष्ठीना विनंती करणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.